Loading...
संपर्क
+९१ ८००७५९७०९०
मेल
nandkumarsawant1969@gmail.com
F २०४ श्री गणेश संकुल, ६७/अ सोमवार पेठ सातारा - ४१५००१

ध्येयाप्रती निरंतर कार्यरत

ध्येयाची वाटचाल

आमचे कार्य

छ. शाहू महाराज थोरले यांची जयंती व पुण्यतिथी कार्यक्रम

  • छ. शाहू महाराज थोरले यांची जयंती व पुण्यतिथीचे मोठ्या प्रमाणावर आयोजन करणे.
  • छ. शाहू महाराज थोरले यांचे कार्याचा प्रचार व प्रसार करणे.
  • छ. शाहू महाराज थोरले यांच्या नावाने समाजातील व्यक्तींना राज्यस्तरीय पुरस्कार देणे.
  • छ. शाहू महाराज थोरले यांच्या नावाने आंतरराष्ट्रीय स्तरावर छ. शाहूमहाराज फेस्टीव्हल चे आयोजन करणे.
  • छ. शाहू महाराजांच्या चरित्राचे संशोधन करुन त्यांच्या जीवनावरील विविध पुस्तकांचे प्रकाशन करणे.
Image
Image

विविध साहित्य विषयक कार्यक्रम

  • विविध साहित्य विषयक कार्यक्रम घेणे, व्याख्याने, परिसंवाद, चर्चासत्र, साहित्य संमेलनाचे आयोजन करणे.
  • मराठी भाषा संवर्धन व वाढीसाठी प्रयत्न करणे.
  • सामाजिक, साहित्य, कला सांस्कृतिक, शैक्षणिक, पत्रकार, सहकार व अन्य कोणत्याही क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती, संस्था यांना पुरस्कार देवून सन्मानीत करणे व आवश्यक ती मदत करणे.
  • लोककला, नाट्य, सिनेमा अशा क्षेत्रात काम करणाऱ्या कलाकारांना मोफत मार्गदर्शन करणे व प्रोत्साहन देणे. तसेच सामाजिक उपक्रमांवर आधारीत लघुपट, चित्रपट, नाटके यांची निर्मिती करणे.
  • वाचन संस्कृती वाढविण्यासाठी ग्रंथालयाची उभारणी करणे व त्याअनुषंगाने विविध प्रकारचे उपक्रम व कार्यक्रमांचे आयोजन करणे.
  • धर्मादाय स्वरुपाचे रुग्णालय उभारुन समाजातील गरीब व गरजू रुग्णांची सेवा करणे. तसेच समाजातील गरीब रुग्णांना आवश्यक ते सर्व प्रकारचे वैहाकीय सहाय्य करणे.
  • मोफत वृध्दाश्रम, बालकाश्रम, शिशुगृहे, अनाथाश्रम चालविणे.
  • नैसर्गिक आपत्तीमध्ये सापडलेल्या आपत्तीग्रस्तांना मदत करणे तसेच मोफत मदत केंद्र चालविणे.
  • समाजातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांना तसेच गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक दृष्ट्या मदत करणे तसेच शैक्षणिक साहित्य यांचा मोफत पुरवठा करणे. उदा. गणवेश, वहया-पुस्तके.
  • पुस्तके, संदर्भ पुस्तके यांचे संकलन करुन ग्रंथालय अथवा अभ्यासिकांव्दारे सदर विद्यार्थ्यांना शैक्षणिक सहाय्य करुन प्रोत्साहन देणे.
  • स्पर्धा परिक्षा विषयक मोफत मार्गदर्शनपर व्याख्यानांचे आयोजन करणे. तसेच सर्व प्रकारच्या स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोफत अभ्यासिका व ग्रंथालय सुरु करणे.
  • गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीचे आयोजन करुन पुढील शिक्षणासाठी प्रोत्साहन देणे.
Image
Image
  • समाज प्रबोधनासाठी वेगवेगळ्या विषयांवर निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा यांचे आयोजन करणे.
  • शासनमान्य खेळांच्या विविध स्तरावरील स्पर्धाचे आयोजन करणे व त्या यशस्वीपणे पार पाडणे. तसेच या क्रिडा प्रकारांमध्ये जिल्हा, राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी जाणाऱ्या खेळाडूंना आवश्यक ती मदत मिळवून देणे व प्रोत्साहन देणे.
  • सोशल मिडीयाचा योग्य व प्रभावी वापर करणे बाबत समाजमाध्यमात जनजागृती करणे.
  • मोफत सामुदायिक विवाह सोहळ्यांचे आयोजन करणे अगर शासनामार्फत होणाऱ्या मोफत विवाह सोहळ्यांना मदत करणे.
  • समाजातील अंध, अपंग, दिव्यांगासाठी न्यासामार्फत आवश्यक ते सर्व प्रकारचे कार्य करणे.
  • विविध प्रकारच्या उद्योग, व्यवसायासाठी आवश्यक असणारे प्रशिक्षण मोफत देणे.